हिमाचल प्रदेशमधे बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात १२ जणांचा मृत्यू

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हिमाचल प्रदेशाच्या कुल्लू जिल्ह्यात आज सकाळी एक खासगी बस खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात किमान १२ जणांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले. सैंजला जाणारी ही बस जंगला गावाजवळ दरीत कोसळली. बचाव पथकानं घटनास्थळी पोहोचून काही जणांना बाहेर काढलं. या दुर्घटनेबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. स्थानिक प्रशासन सर्व ते सहाय्य करत आहे, असं त्यांनी ट्विटरवर म्हटलं आहे. मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येकाच्या कुटुंबियांना प्रधानमंत्री राष्ट्रीय निधीतून दोन लाख रुपये देण्याची घोषणा त्यांनी केली. तसंच प्रत्येक जखमीला ५० हजार रुपये दिले जातील. 

Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image