हिंदुत्वासाठी आग्रह धरणाऱ्या आनंद दिघे यांच्या शिष्याला मुख्यमंत्री पद दिलं - चंद्रकात पाटील

 

मुंबई (वृत्तसंस्था) : भाजपाला सत्तेचा मोह नाही. त्यामुळं हिंदुत्वासाठी आग्रह धरणाऱ्या आनंद दिघे यांच्या शिष्याला मुख्यमंत्री पद दिलं, असं प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. शिंदे यांना मुख्यमंत्री केलं जाईल याची कल्पना घोषणा होण्यापूर्वी केवळ ५ जणांनाच होती, असंही त्यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रशासनातला अनुभव उपयोगी ठरावा म्हणून देवेंद्र फडवणीस यांनी पक्ष नेतृत्वाचा आदेश पाळला आणि मोठं मन दाखवून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, असं ते म्हणाले.