खालवलेली आर्थिक स्थिती लक्षात घेऊन ४ सहकारी बँकावर रिझर्व्ह बँकेने घातले निर्बंध

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिझव्‍‌र्ह बँकेनं चार सहकारी बँकांची खालावलेली आर्थिक स्थिती लक्षात घेऊन पैसे काढण्यावर निर्बंध लादले आहेत. या चार बँकांमध्ये महाराष्ट्रातील साईबाबा जनता सहकारी बँक, द सूरी फ्रेंड्स युनियन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड,सूरी पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशातील दोन बँका, युनायटेड इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, बिजनौर आणि नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक बहराइच यांचा समावेश आहे.

साईबाबा जनता सहकारी बँकेचे ठेवीदार २० हजार रुपये तर द सूरी फ्रेंड्स युनियन को-ऑपरेटिव्ह बँकेचे ठेवीदार ५० हजारापेक्षा जास्त रक्कम काढू शकत नाहीत. नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या बाबतीत, पैसे काढण्याची मर्यादा प्रति ग्राहक १० हजार रुपये ठेवण्यात आली असून युनायटेड इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, बिजनौरवर पैसे काढण्यावर बंदी घालण्यात आली आहे. बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट, १९४९ अंतर्गत या चार सहकारी बँकांना आरबीआयने जारी केलेले निर्देश सहा महिन्यांसाठी लागू राहतील.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image