आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी संबंधित सर्व संस्था आणि सर्व राज्यांनी एकत्र येत विकास आराखडा तयार करावा - अर्जुन मुंडा

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी संबंधित सर्व संस्था आणि सर्व राज्यांनी एकत्र येत विकास आराखडा तयार करायचं आवाहन केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा यांनी केलं आहे. आदिवासी समुदायांच्या उत्थानासाठी पालघरमध्ये आयोजित मंथन शिबीराचं आज मुंडा यांच्या हस्ते उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. या शिबीरात विविध राज्यांचे आदिवासी व्यवहार मंत्री, मुख्य सचिव, तसंच ज्या राज्यांमध्ये आदिवासी संग्रहालयाची उभारणी केली जाणार आहे तिथले संचालक सहभागी झाले होते. आदिवासी समाजाचा आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकास कसा करता येईल यावर या शिबीरात चर्चा झाली. तसंच सरकारच्या वतीनं आदिवासी समाजाच्या विकासासाठी राबवल्या जात असलेल्या उपक्रमांची माहितीही दिली गेली. या शिबीराला उपस्थित विविध राज्यांच्या प्रतिनिधिंनी आपापल्या राज्यातल्या यशोगाथांचं चित्रफितीच्या माध्यमातून सादरीकरण केलं.

Popular posts
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी ३० जानेवारीपर्यंत अर्ज आमंत्रित
Image
गोंडवाना विद्यापीठाचे परीक्षा मॉडेल राज्यात अग्रस्थानावर – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत
Image
एसटीच्या प्रवाशांना स्वस्त दरात “नाथजल” या शुद्ध पेयजल योजनेचं लोकार्पण
Image
चष्म्याच्या दुकानांना लॉकडाऊन मधून वगळा : आप्टीकल ट्रेडर्स असोसिएशनची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी
Image
जगतगुरु तुकोबाराय साहित्य परिषदच्या वतीने संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची जयंती, भक्ती शक्ती शिल्प निगडी येथे मोठ्या उत्साहात साजरी
Image