इंग्लंडमधील लेश्टर मैदानाला क्रिकेटपटू सुनिल गावस्कर यांचं नाव

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंग्लंड मधल्या लेश्टर मैदानाला विख्यात फलंदाज सुनील गावस्कर यांचं नाव देऊन तिथल्या क्रीडांगण प्रशासनानं गावस्कर यांचा सन्मान केला आहे.

गावस्कर यांना आजपर्यंतचा सर्वाधिक कुशल फलंदाज मानलं जातं. ते १० हजार धावांचा पल्ला गाठणारे पहिले वाहिले फलंदाज ठरले होते. त्याशिवाय सर्वाधिक ३४ शतकांचा विक्रमही काही काळ त्यांच्याच नावावर होता.

७० - ८० च्या दशकात वेस्ट इंडीज संघाचा दबदबा असूनही त्यांच्या गोलंदाजांच्या तिखट माऱ्याचा लीलया सामना करत गावस्कर यांनी आपला प्रभाव पाडला होता. १९८३ साली विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघातही गावस्कर यांचा समावेश होता.