राज्यात कोवीड १९ च्या २ हजार १५ नव्या रुग्णांची नोंद

 


मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल कोवीड १९ च्या २ हजार १५ नव्या रुग्णांची नोंद झाली, १ हजार ९१६ रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर ६ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ८० लाख ३४ हजार २६१ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत ७८ लाख ७१ हजार ५०७ रुग्ण बरे झाले, तर १ लाख ४८ हजार ६२ रुग्ण दगावले. सध्या राज्यात १४ हजार ६९२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ९७ शतांश टक्के, तर मृत्यूदर १ पूर्णांक ८४ शतांश टक्के आहे.पुण्यातल्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था आणि बी जे वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालानुसार राज्यात बी ए-फोरचे दोन, तर बीए फायचे २८ रुग्ण आढळले आहेत. याशिवाय बीए 2.75 चे १८ रुग्ण आढळले आहेत.

Popular posts
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
मुंबईतील किल्ल्यांच्या विकास शासकीय निधीबरोबरच बाह्यस्त्रोताद्वारे राबविण्याचे नियोजन करावे – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image