4-जी आणि 5-जी स्पेक्ट्रम सेवेचा देशभरात विस्तार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 4-जी आणि 5-जी स्पेक्ट्रम ची सेवा देशभरात विस्तारित करताना जागितक दर्जा उंचावणं तसंच सर्वसमावेशक सेवांचा लाभ गुंवणूकदारांना घेता यावा यासाठी उच्च तंत्रज्ञान युक्त 5-जी मिळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याची महिती, केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं.

दूरसंचार टॉवर्सना मंजुरीसाठी महिनोंमहिने वाट बघावी लागत होती त्यांना आज काही मिनिटांच्या कालावधीत ७५ टक्क्यांपर्यंत मंजुरी मिळाली आहे. दूरसंचार क्षेत्रात झालेल्या सुधारणांमुळे दूरसंचार क्षेत्रातला खर्च कमी झाला असून  भारतात 5-जी सुरु करण्यासाठी सरकार स्थानिक कंपन्या आणि स्टार्टअप ना प्रोत्साहन देणार असल्याचं ही ते म्हणाले. 

5-जी कार्यप्रणाली आणि दूरसंचार सुधारणांमध्ये गुंतवणुकीच्या संधी या विषयावरील दूरसंचार गुंतवणूकदरांच्या गोलमेज परिषदेला केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज मुंबईत संबोधित केलं.  या परिषदेचं उदघाटन डिजिटल दळणवळण आयोगाचे अध्यक्ष आणि दूरसंचार विभागाचे सचिव के राजारामन यांच्या हस्ते झालं.

यावेळी ५ जी तंत्रज्ञान विकसित करणं हा सरकारने घेतलेला एक महत्वपूर्ण निर्णय असल्याचं के राजारामान यांनी सांगितलं. 5-जी स्पेक्ट्रमच्या लिलावाला चांगला प्रतिसाद मिळत असून लिलाव संपल्यानंतर काही दिवसातचं 5-जी स्पेक्ट्रमचं वाटप केलं जाईल असंही ते यावेळी म्हणाले. 

Popular posts
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
मुंबईतील किल्ल्यांच्या विकास शासकीय निधीबरोबरच बाह्यस्त्रोताद्वारे राबविण्याचे नियोजन करावे – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image