खाद्य तेलाच्या किंमती प्रति लीटर 15 रुपयांनी तत्काळ कमी करण्याचे, केंद्राचे निर्देश

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या प्रमुख खाद्य तेल संघटनांनी खाद्य तेलाच्या किमती प्रति लीटर 15 रुपयांनी तत्काळ कमी कराव्यात असे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत. तेल उत्पादक आणि शुद्धीकरण कंपन्यांनी वितरकांसाठीचे दरही तत्काळ कमी करावेत असे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत.

अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने 6 जुलै रोजी खाद्य तेल संघटनांबरोबर झालेल्या बैठकीत हे निर्देश दिले. खाद्य तेलाचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कमी होत असून दर कपातीचा लाभ ग्राहकांपर्यंत त्वरित पोहोचायला हवा, असं ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे.

Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image