मुंबई विमानतळावर NCB विभागाकडून ३ कोटी रुपयाचे अमली पदार्थ जप्त

 

मुंबई (वृत्तसंस्था) : अमलीपदार्थ नियंत्रक विभागाने मुंबई विमानतळावर केलेल्या कारवाईत ५३५ ग्रॅम हेरॉईन आणि १७५ ग्रॅम कोकेन जप्त केलं.  मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर युगांडाहून आलेल्या महिलेने शरीरात लपवलेला  हा साठा जप्त केला असून तिला पुढच्या तपासणीसाठी जे.जे. रुग्णालयात भरती केलं आहे. पकडण्यात आलेल्या अमली पदार्थांची किंमत सुमारे ३ कोटी रुपये असल्याचं NCB ने ट्विटरवर म्हटलं आहे. गेल्या शनिवारी ही कारवाई झाली.