मुंबई पोलीस आयुक्तपदी विवेक फणसळकर यांची नियुक्ती करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी भारतीय पोलीस सेवेतले ज्येष्ठ अधिकारी विवेक फणसळकर यांची नियुक्ती करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. सध्या त्यांच्याकडे पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाचं व्यवस्थापकीय संचालकपद होतं. विद्यमान पोलीस आयुक्त संजय पांडे आज सेवानिवृत्त होत असल्यानं ही नेमणूक करण्यात आली आहे.

फणसळकर यांचा कार्यभार, मंडळाच्या सह व्यवस्थापकीय संचालक अर्चना त्यागी यांच्याकडे सोपवला आहे. दरम्यान, पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवन इथं निरोप भेट घेतली.