कायद्याच्या विद्यार्थ्यांना कामाच्या अनुभवाची संधी मिळावी याकरता प्रशिक्षणार्थी कार्यक्रम सुरु

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कायद्याच्या विद्यार्थ्यांना कामाच्या अनुभवाची संधी मिळावी याकरता केंद्रीय कायदा मंत्रालयानं देशातल्या ५ महानगरातल्या आपल्या कार्यालयात प्रशिक्षणार्थी कार्यक्रम सुरु केला आहे.

त्यात मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, कोलकाता आणि चेन्नैचा समावेश आहे. कायद्याच्या अनुषंगानं संशोधन, संदर्भ तपासणी, प्रशासकीय, संविधानविषयक, कामगारविषयक, लवाद, कंत्राटी कायदे अशा विविध क्षेत्रातल्या कायदेशीर बाबींचा सल्ला आणि मार्गदर्शन अशा स्वरुपाचं हे प्रशिक्षण असणार आहे. निवडझालेल्या विद्यार्थांयांना विद्यावेतनही दिलं जाईल असं कायदे मंत्रालयाच्या पत्रकात म्हटलं आहे.