काश्मीरमधल्या सुरक्षा स्थितीचा अमित शाह यांनी घेतला आढावा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मध्य काश्मिरमध्ये बडगाम जिल्ह्यातल्या चंदूरा भागातल्या मगरायपोरा इथं काल रात्री दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात इतर राज्यातून आलेले दोन मजूर जखमी झाले, त्यापैकी एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

काश्मिर खोऱ्यात बारा तासांहून कमी वेळात इतर राज्यातल्या मजुरांवर झालेला हा दुसरा हल्ला आहे. केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी आज काश्मीरमधल्या सुरक्षा स्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्च स्तरीय बैठक आयोजित केली आहे. नवी दिल्ली इथं होणाऱ्या या बैठकीत जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील. गेल्या महिन्यात अमरनाथ यात्रेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी अशी बैठक झाली होती.