सोनिया गांधी यांच्यावर कोरोना पश्चात उदभवणाऱ्या आजारावर उपचार सुरू

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेस पार्टीच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर नाकावाटे रक्तस्त्राव सुरू झाला, त्यांनंतर त्यांना या महिन्याच्या १२ तारखेला नवी दिल्ली इथल्या सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

काल त्यांची चिकित्सा केल्यानंतर त्यांच्या श्वसनमार्गाच्या खालच्या भागाला बुरशीजन्य संसर्ग झाल्याचं निदान झालं आहे. सध्या त्यांच्यावर या संसर्गा व्यतिरिक्त कोरोना पश्चात उदभवणाऱ्या आजारावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती काँग्रेसनं जारी केलेल्या पत्रकात दिली आहे.