मुंबई : राज्य विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी सोमवार दि. 20 जून 2022 रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडली. उमेदवारांना जिंकण्यासाठीचा 2600 हा मतमूल्यांचा कोटा पूर्ण करण्यासाठी फेरीनिहाय मिळालेले मतमूल्य पुढीलप्रमाणे :
पहिल्या फेरीअखेर राम शिंदे (भाजपा) यांना 3000, श्रीकांत भारतीय (भाजपा) यांना 3000, एकनाथ खडसे (राष्ट्रवादी काँग्रेस) यांना 2900, प्रवीण दरेकर (भाजपा) यांना 2900, रामराजे नाईक निंबाळकर (राष्ट्रवादी काँग्रेस) यांना 2700, श्रीमती उमा खापरे (भाजपा) यांना 2700, सचिन अहिर (शिवसेना) यांना 2600 आणि आमश्या पाडवी (शिवसेना) यांना 2600 तर पाचव्या फेरीअखेर प्रसाद लाड (भाजपा) यांना 2857 इतके मतमूल्य मिळून त्यांनी विजयासाठीचा कोटा पूर्ण केला.
दहाव्या व शेवटच्या फेरीअखेर भाई जगताप (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) यांना 2474 इतकी मतमूल्य तर चंद्रकांत हंडोरे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) यांना 2200 इतकी मतमूल्य मिळाली. या फेरीअखेर अधिक मतमूल्यांच्या आधारे श्री.जगताप हे विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री.राजेंद्र भागवत यांनी जाहीर केले.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.