अयोध्येतल्या राम मंदीराच्या गर्भ गृहाच्या बांधकामाला सुरवात

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अयोध्येतल्या राम मंदीराच्या गर्भ गृहाच्या बांधकामाला आजपासून सुरवात झाली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते या गर्भगृहाचा शिलान्यास करण्यात आला. संपूर्ण देशभरातले साधू संत या कार्यक्रमाला उपस्थित होते. या संपूर्ण मंदीराची उभारणी राजस्थान इथल्या मकराना मार्बलनं केली जाणार असल्याची माहिती राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टनं दिली. दरम्यान अयोध्येतल्या सर्व मंदिरांना फुलांनी सजवलं आहे. तसंच संपूर्ण शहरात विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे.