अपघात चाचणींवर आधारित स्वयंचलित वाहनांना तारांकित गुणांकन देण्याविषयाचा मसुदा प्रकाशित

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी भारत-नवीन कार मुल्यांकन कार्यक्रम सुरू करण्यासाठी जीएसआर अधिसूचनेच्या मसुद्याला मंजुरी दिली आहे.

भारत-एनसीएपी हे ग्राहक केंद्रित मंच म्हणून काम करेल, त्यामुळे ग्राहकांना गुणांकनाच्या आधारे सुरक्षित कारची निवड करता येईल आणि सुरक्षित वाहनं तयार करण्यासाठी भारतातल्या उपकरण निर्मात्यांच्या निरोगी स्पर्धेला प्रोत्साहन मिळेल असं गडकरी यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे.

नवीन कार मूल्यांकन कार्यक्रम हा भारतातल्या वाहन उद्योगाला जगात पहिल्या क्रमांकाचं ऑटोमोबाईल संकुल बनवण्याच्या उद्देशानं एक महत्वपूर्ण साधन असल्याचं सिद्ध होईल असंही गडकरी म्हणाले.