योगविद्येला जागतिक पातळीवर अधिकाधिक लोकप्रियता मिळू लागली आहे : पंतप्रधान

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की योगविद्येने जागतिक पातळीवर प्रचंड लोकप्रियता मिळविली आहे. राजकीय नेते, कंपन्यांचे प्रमुख, क्रीडापटू आणि अभिनयाच्या क्षेत्रातील व्यक्तींसह जीवनाच्या विविध क्षेत्रांतील लोक नियमितपणे योगाचा सराव करतात असे देखील त्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी योगावर आधारित व्हिडीओ सर्वांसाठी सामायिक केला.

“गेल्या काही वर्षात, योगशास्त्र प्रचंड लोकप्रिय ठरले आहे. विविध क्षेत्रातील लोक, नेते, कंपन्यांचे प्रमुख, क्रीडापटू, अभिनेते दररोज योगाभ्यास करतात आणि त्याचा त्यांना कसा फायदा झाला, हे ही सांगतात.”

गेल्या काही वर्षात, योगशास्त्र प्रचंड लोकप्रिय ठरले आहे. विविध क्षेत्रातील लोक, नेते, कंपन्यांचे प्रमुख, क्रीडापटू, अभिनेते दररोज योगाभ्यास करतात आणि त्याचा त्यांना कसा फायदा झाला, हे ही सांगतात.

https://t.co/UESTuNPNbW

 Narendra Modi (@narendramodi) June 13, 2022