खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा २०२१ च्या पदक तालिकेत ३७ सुवर्णपदकांसह महाराष्ट्र आघाडीवर

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खेलो इंडिया युवा क्रीडास्पर्धा २०२१ मध्ये, ३७ सुवर्ण, ३४ रौप्य आणि २९ कास्यपदकांसह पदक तालिकेत महाराष्ट्र अव्वल ठरला आहे. महाराष्ट्राने आतापर्यंत १०० पदकांची कमाई केली आहे.तर हरियाणा ३६ सुवर्ण, ३३ रौप्य आणि 39 कास्य पदकांसह दुसऱ्या स्थानावर आहे. हरियाणानं १०८ पदकांची कमाई केली आहे. २१ सुवर्ण, १३ रौप्य आणि १८ कास्य पदकांसह कर्नाटक तिसऱ्या स्थानावर आहे.  मणिपूर १६ सुवर्ण, ३ रौप्य आणि ४ कास्य पदकांसह चौथ्या स्थानावर आहे. १३ सुवर्ण, १४ रौप्य आणि ११ कास्य पदकांसह केरळ पाचव्या स्थानावर आहे.