जिल्हा न्यायालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा   

 

पुणे : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालय पुणे आणि राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालय येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगाभ्यास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे उदघाटन प्रमुख जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा न्यायाधीश-१ एच.के.भारुका, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव मंगला कश्यप आदी उपस्थित होते.

श्री.देशमुख यांनी यावेळी दररोज योगसाधना महत्वाची असल्याचे सांगितले. निसर्गोपचार संस्थेचे डॉ.परेश  वाडेकर आणि डॉ.सीमा भावन यांनी योगाचे महत्व प्रत्यक्षिकांसह सांगितले.