निवडणुकांची वेळ येणार नाही, पण आलीच तर आम्हा तयार आहोत - छगन भुजबळ

 


मुंबई (वृत्तसंस्था) : मध्यावधी निवडणुकांची वेळ येणार नाही, पण आलीच तर आम्हा तयार आहोत. राज्यकीय पक्षाांनी नेहमीच निवडणुकीला सामोरं जाण्याची तयारी ठेवावी, असं मत अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळाची बैठक सुरू होणार आहे. उद्धव ठाकरे यांना कोरोनाची बधा  झाल्यामुळे ते दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून या बैठकीला संबोधीत करणार आहेत. सध्या राज्यात उद्भवलेला पेचप्रसंग भाजपनं इन्कम टॅक्स, सीबीआय, पोलीस यंत्रणा, इडीच्या धाडी यांचा वापर करून  पूर्वनियोजित पद्धतीनं घडवून आणला आहे, असा आरोप शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी  केला आहे.