लोकसभेच्या ३ आणि विधानसभेच्या ७ जागांच्या पोट निवडणूकीसाठी आज मतदान

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभेच्या ३ आणि विधानसभेच्या ७ जागांच्या पोट निवडणूकीसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकांमध्ये उत्‍तर प्रदेश मधला रामपूर आणि आजमगड लोकसभा मतदार संघ, पंजाब मधला संगरूर लोकसभा मतदार संघ, दिल्‍लीतला राजेन्‍द्र नगर विधानसभा मतदारसंघ, त्रिपुरा राज्यातले  बोरदोवली टाउन, आगरतळा, सुरमा आणि जुबराजनगर हे चार विधानसभा मतदार संघ, आंध्रप्रदेशमधला आत्मकुर विधानसभा मतदार संघ आणि झारखंडमधल्या मंडार विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीचा समावेश आहे. या निवडणुकांची मतगणना २६ जून ला होणार आहे.