राष्ट्रपती राजवट लावण्याचं कोणतंही कारण सध्या नाही - बाळासाहेब थोरात

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याचं कोणतंही कारण सध्या दिसत नसून राज्यात हा प्रयोग यशस्वी ठरणार नाही, असं काँग्रेस नेते आणि महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत काँग्रेस पक्षाच्या बैठकीत बोलत होते. या बैठकीत राज्यातल्या विद्यमान राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. महाविकास आघाडी सरकार म्हणून आम्ही कार्यरत आहोत असं ते म्हणाले. सध्या घटनात्मक पेचावर कायद्याची लढाई सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली. 

महाराष्ट्राबाहेर गेलेल्या आमदार, मंत्र्यांबाबत काय करायचं याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील असं त्यांनी सांगितलं. राज्यात कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नाही असं काँग्रेस नेते अशोक चव्हाण यावेळी म्हणाले. कोणी कुणाच्या नावानं गट तयार केला तरी अधिकृतरित्या या गटाला आणि नावाला मान्यता मिळत नाही तोपर्यंत याला काही अर्थ नाही असं त्यांनी सांगितलं.