ज्ञानवापी मशीदीसंदर्भात कोणताही वाद न करता न्यायालयाचा निर्णय मान्य करावा - मोहन भागवत

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्ञानवापी मशीदीसंदर्भातला इतिहास आपण बदलू शकत नाही, त्यामुळे दोन्ही पक्षांनी कोणताही वाद न करता न्यायालयाचा निर्णय मान्य करावा, असं राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष अधिकारी प्रशिक्षण शिबिराच्या समारोप समारंभात ते बोलत होते. प्रत्येक मशिदीत ‘शिवलिंग’ शोधण्याची, तसंच दरदिवशी नवा वाद निर्माण कऱण्याची गरज नाही, असंही ते म्हणाले.