मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन

 

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले. राजभवन येथे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी राज्यपाल श्री. कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ व शाल देऊन शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी उपस्थित पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनीही राज्यपाल श्री. कोश्यारी यांना शुभेच्छा दिल्या.