राज्यात कोरोनाच्या १ हजार ४९५ नव्या रुग्णांची नोंद

 


मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल कोरोनाच्या १ हजार ४९५ नव्या रुग्णांची नोंद झाली तर ६१४ रुग्ण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुळं मुंबईतल्या एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. एकूण रुग्णांपैकी ९१ टक्क्यांहून अधिक रुग्ण मुंबई महानगर क्षेत्रातले आहेत तर ९५ रुग्ण पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुण्यातल्या ग्रामीण भागातले आहेत. मुंबईत काल ९६१, ठाणे शहरात १०८, पुणे शहरात ६३ रुग्णांची नोंद झाली. सध्या राज्यात ६ हजार ७६७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत त्यातले ४ हजार ८८० मुंबईतले आहेत.