जनतेला आंदोलनाचा अधिकार आहे मात्र लोकशाहीत हिंसेला थारा नसल्याचं उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जनतेला आंदोलनाचा अधिकार आहे मात्र लोकशाहीत हिंसेला थारा नाही, असं परखड मत आज उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी नवी दिल्लीत व्यक्त केलं. राष्ट्रपती निवासात जेएनयु अर्थात जवाहरलाल नेहरू विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांच्या एका गटाशी संवाद साधताना ते बोलत होते.

राष्ट्राची एकता, सार्वभौमत्व आणि एकात्मता याचं रक्षण जनतेनं करायलाच हवं, असं ते म्हणाले. द्वेष आणि असहिष्णुता हे भारतीय संस्कृतीचे भाग नाहीत, असंही ते म्हणाले. भारत सर्वात मोठी संसदीय लोकशाही असून सर्वधर्मसमभावाच्या तत्त्वाचा पाठपुरावा करतो असंही त्यांनी सांगितलं.