कोरोना विषयक निर्बंध नको असतील तर स्वयंशिस्त पाळा – मुख्यमंत्री

 

मुंबई (वृत्तसंस्था) : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत होत असलेली वाढ पाहता, निर्बंध नको असतील तर नागरिकांनी स्वतःहून शिस्त पाळावी, असं आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलं आहे. ते मुंबईत कोरोना कृती दलाच्या बैठकीत बोलत होते.

नागरिकांनी मास्क वापरावा, लसीकरण करून घ्यावं, हात धुवावेत आणि सुरक्षित अंतराचं पालन करावं. राज्य शासन पुढचे पंधरा दिवस लक्ष ठेवून असेल, असं त्यांनी सांगितलं.

कोविड कालावधीत उभारलेली फिल्ड रुग्णालयं व्यवस्थित आहे का ते पहावं, त्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट करुन घ्यावं, अशा सूचना त्यांनी आरोग्य विभागाला दिल्या. कोविड चाचण्यांचे प्रमाण वाढवावं, कोविड विषाणूचा नवीन प्रकारांबाबत सतर्क राहाव, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

लवकरच शाळा सुरू होतील. शाळेच्या बाबत जागतिक स्तरावर काय निर्णय घेतले गेले आहेत, तेथील मुलांना संसर्ग होण्याची स्थिती काय आहे, याबाबत माहिती घ्यावी, असेही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले.

Popular posts
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कार्यक्षेत्रात स्वच्छ महाराष्ट्र अभियान - निबंध, चित्रकला, घोषवाक्य स्पर्धा
Image
जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधून मुंबई आणि महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन
Image
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कृतज्ञतापूर्वक वंदन
Image
राज्यातील कामगारांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती - कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती
Image
भारतानं सादर केलेल्या अजेंड्याला सदस्य देशांची प्राथमिक पातळीवर सहमती
Image