मुंबई उच्च न्यायालयानं नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना विधान परिषद निवडणुकीतही मतदानाची परवानगी नाकारली

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातले मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना विधान परिषदेच्या निवडणुकीतही मतदान करता येणार नाही. मतदानाची परवानगी मागणाऱ्या या दोघांची विनंती मुंबई उच्च न्यायालयानं आज फेटाळली.

येत्या सोमवारी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपांवरुन दोघेही कारागृहात आहेत. गेल्या आठवड्यात झालेल्या राज्यसभा निवडणुकीतही त्यांना मतदानाची परवानगी मिळाली नव्हती.