राज्यसभेतल्या ६ जागंसाठी राज्यात ७ उमेदवार रिंगणात असल्यानं राजकीय हालचालींना वेग

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेतल्या सहा जागांसाठी राज्यात सात उमेदवार रिंगणात असल्यानं राजकीय हालचालींना वेग आला आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजपा आपापल्या उमेदवारांसाठी मोर्चेबांधणी करत आहेत. राज्यातल्या २८८ आमदारांपैकी ५५ आमदार शिवसेनेचे, ५३ आमदार राष्ट्रवादी काँग्रेस आणि ४४ आमदार काँग्रेसचे आहेत. विरोधी पक्ष भाजपकडे १०६ आमदार आहेत. या प्रमुख पक्षांखेरीज बहुजन विकास आघाडी, समाजवादी पार्टी, एआयएमआयएम आणि प्रहार जनशक्ती पक्षाकडे प्रत्येकी दोन आमदार आहेत. यासोबतच मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्ष, पीडब्ल्यूपी, स्वाभिमानी पक्ष, राष्ट्रीय समाज पार्टी, जनसुराज्य पार्टी आणि क्रांतीकारी शेतकरी पार्टी यांचे प्रत्येकी एक आमदार आहेत. या आमदारांच्या मतांवर सहाव्या उमेदवाराचं भवितव्य अवलंबून आहे.