एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्रातील राजकीय हालचालींना वेग

 


मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात, बंडाचा झेंडा उभारुन आधी सुरतमध्ये मुक्काम केलेले शिवसेना नेते एकनाथ शिंदे आता आसामची राजधानी गुवाहाटी इथं पोहोचले आहेत. आपल्यासोबत ४० समर्थक आमदार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तत्पूर्वी काल ते आपल्या समर्थकांसह गुजरातमध्ये सुरत इथं मुक्कामी होते. या घडामोडीनंतर महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग आला.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईत आपल्या निवासस्थानी बोलावलेल्या बैठकीत पक्षाचे ५५ पैकी १४ आमदार उपस्थित होते. पक्षांतर-विरोधी कायद्याला बगल देण्यासाठी शिंदे यांना ५५ पैकी दोन-तृतियांश म्हणजे ३७ सेना आमदारांचा पाठिंबा आवश्यक राहील. दरम्यान मुंबईतील उर्वरित शिवसेना आमदारांना लोअर परळ इथल्या एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. उद्धव ठाकरे यांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे ते दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून या बैठकीला संबोधित करणार आहेत. सध्या राज्यात उद्भवलेला पेचप्रसंग भाजपनं इन्कम टॅक्स, सीबीआय, पोलीस यंत्रणा, इडीच्या धाडी यांचा वापर करून पूर्वनियोजित पद्धतीनं घडवून आणला आहे, असा आरोप शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image