प्रधानमंत्री नवी दिल्लीत होणाऱ्या ‘उद्यमी भारत’ या कार्यक्रमात होणार सहभागी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या नवी दिल्लीत संपन्न होणाऱ्या ‘उद्यमी भारत’ या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान ‘सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची कामगिरी आणि गती, निर्यातदारांची क्षमता वाढवणाऱ्या तसंच पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांच्या योजनांचा शुभारंभ करणार आहेत. उद्यमी भारत हे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या सक्षमीकरणासाठी असलेल्या सरकारच्या वचनबद्धतेचं प्रतीक आहे.