अल्पमतात असल्यामुळे राज्य सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही - रामदास आठवले

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अल्पमतात असल्यामुळे राज्यसरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. एकनाथ शिंदे यांच्या कडून कोणताही प्रस्ताव आलेला नसल्याचं त्यांनी स्पष्टं केलं. शिवसेनेच्या अधिकृत गटनिश्चितीबाबत विधीमंडळानं घटनाविरोधी निर्णय घेऊ नये असं आवाहनही आठवले यांनी यावेळी केलं.