चट्टोग्राम इनलँड कंटेनर डेपोला लागलेल्या आगीत बळी पडलेल्यांप्रति प्रधानमंत्र्यांकडून शोक व्यक्त

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशातल्या चट्टोग्राम इनलँड कंटेनर डेपोला लागलेल्या आगीत बळी पडलेल्यांप्रति शोक व्यक्त केला आहे.  चट्टोग्रामजवळ कंटेनर डेपोला लागलेल्या भीषण आगीत मौल्यवान जीवितहानी झाली.

अनेक जण जखमी झाल्याची बातमी ऐकून मला खूप धक्का बसला,असं प्रधानमंत्री मोदी यांनी, बांगलादेशच्या प्रधानमंत्री शेख हसीना यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. बांगलादेशमधल्या चट्टोग्रामजवळच्या  सीताकुंडा इथल्या इनलँड कंटेनर डेपोला शनिवारी भीषण आग लागली होती. या दुर्घटनात ९ अग्निशमन कर्मचार्‍यांसह ४४ जणांचा मृत्यू झाला.