देशात अजूनतरी कोरोनाची चौथी लाट आली नसल्याचा ICMR चा निर्वाळा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड रुग्णसंख्येत अलिकडे वाढ नोंदली असली तरी या घटनेला चौथी लाट म्हणता येणार नाही असं भारतीय वैद्यक संशोधन संस्थेनं स्पष्ट केलं आहे.

संस्थेचे अतिरिक्त महासंचालक समीरण पांडा यांनी आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितलं की, काही जिल्ह्यांमधे हा प्रादुर्भाव वाढलेला दिसत असला तरी त्याचं स्वरुप राज्यव्यापी किंवा राष्ट्रव्यापी नाही.