नोकऱ्यांमध्ये स्थानिक उमेदवारांना प्राधान्य द्या - राज ठाकरे

 

मुंबई (वृत्तसंस्था) : नोकऱ्यांमध्ये स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याच्या आपल्या भूमिकेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुनरुच्चार केला. ते आज पुण्यात जाहीर सभेत बोलत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशात समान नागरी कायदा आणावा, लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठीही कायदा करावा तसंच औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करावं, अशी मागणी त्यांनी केली.

औरंगाबादमध्ये दहा दिवसांतून एकदा पाणी येतं. तसंच राज्यातल्या विविध शहरांच्या नागरी समस्या, ऊसाचा प्रश्न याकडे त्यांनी यावेळी लक्ष वेधलं. मशिदींवरचे भोंगे काढण्याच्या भूमिकेचाही ठाकरे यांनी पुनरुच्चार केला. राज्यात सत्ताधाऱ्यांनी नामांतराच्या मुद्यांसह विविध विषयांचं निवडणुकीसाठी राजकारण केलं.एमआयएमला मोठं करण्याचं राजकारण करण्यात आलं, अशी टीकाही ठाकरे यांनी यावेळी केली.

Popular posts
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत थेट कर्ज योजना राबवली जाते
Image
‘यपटीव्ही’ने आयपीएल २०२१च्या ब्रॉडकास्टिंगचे अधिकार मिळवले
Image
भारतीय प्रशासकीय सेवेतले ज्येष्ठ अधिकारी गौरव द्विवेदी यांनी प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला
Image
वैद्यकीय ऑक्सिजन उत्पादन वाढवण्यासाठी 'एमजी मोटर इंडिया'चा पुढाकार
Image
'इंद्रायणी स्वच्छता' जनजागृती मोहिमेअंतर्गत रीव्हर 'सायक्लोथॉन २०२२' रॅलीचे रविवारी आयोजन
Image