देशभरातील उष्णतेच्या लाटेबाबत सर्व राज्यांना खबरदारीचा इशारा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्राने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना उष्णतेच्या लाटेच्या प्रकरणांचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये उष्णतेशी संबंधित रोगांवरील मार्गदर्शक सूचना प्रसारित करण्यास सांगितले आहे.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, भारतीय हवामान खात्याने या वर्षी मार्च ते मे या कालावधीत जारी केलेल्या हंगामी आणि मासिक पत्रानुसार देशातील अनेक भागात कमाल तापमान सामान्य राहण्याची अधिक शक्यता आहे.

देशाच्या मध्य, पश्चिम आणि उत्तरेकडील भागात तापमान खूप जास्त राहण्याचा अंदाज आहे. अनेक ठिकाणी तापमान आधीच 46 अंशांवर पोहोचलं आहे.