नेपाळचे ज्येष्ठ गिर्यारोहक कामी रीता शेर्पा यांनी माऊंट एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर २६ वेळा पादाक्रांत करत नवीन विश्व विक्रम रचला

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेपाळचे ज्येष्ठ गिर्यारोहक कामी रीता शेर्पा यांनी माऊंट एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर २६ वेळा पादाक्रांत करत नवीन विश्व विक्रम रचला आहे. हा विश्वविक्रम रचत कामी यांनी स्वतःचाच  विक्रम तोडला आहे.

कामी रीता शेर्पा यांच्या नेतृत्वाखाली काल ११ जणांच्या चमूनं माऊंट एव्हरेस्टचं शिखर गाठलं. नेपाळमधल्या सोलुखुम्बु जिल्ह्यात कामी रीता शेर्पा यांचा जन्म १९७० मध्ये झाला. कामी रीता यांनी १९९४ मध्ये पहिल्यांदा एव्हरेस्ट शिखर सर केलं होतं.

नेपाळच्या पर्यटन विभागानं दिलेल्या माहितीनुसार या मौसमात एव्हरेस्टवर चढण्यासाठी 316 गिर्यारोहकांनी अर्ज केले आहेत.