रायगड जिल्ह्यात घोणसे घाटात झालेल्या अपघातात तीन ठार, २५ जखमी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : रायगड जिल्ह्यात म्हसळा तालुक्यातल्या घोणसे घाटात आज सकाळी एका खासगी बसला झालेल्या अपघातात तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर २५ प्रवासी जखमी झाले. हे सर्वजण म्हसळा तालुक्यातल्या धनगर मलई परिसरातले, पण मुबंईला राहणारे असून एका कार्यक्रमासाठी आपल्या गावाला जात असताना घाटात त्यांची बस दरीत कोसळली.

परिसरातल्या लोकांनी तातडीनं मदतीसाठी धाव घेतली. म्हसळा पोलिसही घटनास्थळी पोचले आणि त्यांनी मदतकार्य सुरु केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. जखमींवर म्हसळा इथल्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गंभीर जखमी झालेल्या काही प्रवाशांना माणगाव इथल्या रुग्णालयात नेण्यात आले असल्याचे म्हसळा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक उद्धव सुर्वे यांनी सांगितहलवलं आहे.

रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनीही तातडीने अपघातग्रस्तांची भेट घेतली असून, अपघातग्रस्तांना आवश्यक उपचार देण्याविषयी आरोग्य यंत्रणेला निर्देश दिले आहेत. 

Popular posts
विधानभवनाच्या प्रवेशद्वारावरच्या पायऱ्यांवर आंदोलन करायला, आणि प्रसारमाध्यमांनी तिथे चित्रीकरण करायला बंदी घालावी - जयंत पाटील
Image
देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशींच्या 122 कोटींचा टप्पा ओंलाडला
Image
महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयकाला विधानसभेत मंजुरी
Image
शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी कृषी व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या पदवीधरांनी काम करावं- केंद्रीय कृषीमंत्री
Image
राज्यात आतापर्यंत ६४ लाख ५६ हजार ९३९ जणांना कोरोनाची लागण
Image