देशातल्या शेअर बाजारात सर्व क्षेत्रांचे समभाग तेजीत
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या शेअर बाजारांनी कालच्या घसरणीपेक्षा मोठी तेजी आजच्या व्यवहारात नोंदवली आणि सेन्सेक्सनं पुन्हा ५४ हजार तर निफ्टीनं १६ हजार २०० ची पातळी ओलांडली. व्यवहार बंद होताना सेन्सेक्स १ हजार ५३४ अंकांनी वधारला आणि ५४ हजार ३२६ अंकांवर बंद झाला. निफ्टी ४५७ अंकांनी वधारुन १६ हजार २६६ अंकांवर बंद झाला. सर्व क्षेत्रांचे समभाग आज तेजीत दिसून आले. धातू, बांधकाम, औषध उद्योग आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या समभागांनी आज सर्वात जास्त तेजी नोंदवली. डॉलरच्या तुलनेत रुपया आज १८ पैसे मजबूत झाला आणि त्याचं मूल्य ७७ रुपये ५४ पैसे प्रति डॉलर इतकं झालं.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.