ड्रोन आणि त्याच्या उपकरणांची निर्मिती करणाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता दिला जाणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं ड्रोन विमान आणि त्याच्या उपकरणांची निर्मिती करणाऱ्यां उत्पादकांकडून निविदा मागवल्या आहेत. २०२१-२०२२ या आर्थिक वर्षांसाठी ड्रोन आणि त्याच्या उपकरणांची निर्मिती करणाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे. 

आवश्यक ते निकष पूर्ण करणारे उत्पादनकर्ते अर्ज करू शकतात. अटी-नियमांचं पालन करणाऱ्या उत्पादकांना www.civilaviation.gov.in या संकेतस्थळावर  त्यांच्या निविदा भरता येतील. निविदा भरण्याची अंतिम तारीख २० मे २०२२ आहे. लाभार्थींची अंतिम यादी ३० जून २०२२ पर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे.