भारत बांगलादेश दरम्यान मैत्री एक्स्प्रेसला पुन्हा आरंभ

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत बांगलादेश दरम्यान सुरु करण्यात आलेली मैत्री एक्स्प्रेस ही प्रवासी रेल्वे सेवा दोन वर्षानंतर काल पुन्हा सुरु करण्यात आली. बांगलादेशच्या रेल्वे मुख्याधिकाऱ्यांनी ढाका इथून जवळपास १७० प्रवाशांना गेऊन जाणाऱ्या या मैत्री एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला. जलपायगुडी ते ढाका दरम्यान सुरु होत असलेल्या मिताली एक्स्प्रेसला परवा १ जूनपासून सुरुवात होत आहे त्याला भारताचे रेल्वे मंत्री हिरवा झेंडा दाखवतील. ही रेल्वे आठवड्यातून २ वेळा बुधवार आणि रविवारी धावेल.