गरीब कल्याण संमेलनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा लाभार्थ्यांशी संवाद
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या मंत्राद्वारे आपल्याला २१ व्या शतकातला महान भारत घडवायचा आहे, असा संदेश प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांनी दिला. शिमला इथल्या गरीब कल्याण संमेलनात त्यांनी आज केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. ८ वर्षाच्या काळात तंत्रज्ञानाच्या मदतीनं भ्रष्टाचार कमी झाला. २०१४ पूर्वी या देशात लुटमारीची चर्चा होत होती, आज ती चर्चा सरकारी योजनांची होत आहे अशी टीकाही त्यांनी यावेळी प्रधानमंत्र्यांनी केली. हिमाचलप्रदेश ही माझी कर्मभूमी असल्यानं, या भूमीविषयी माझ्या मनात आदराचे स्थान आहे. माझ्या सरकारला ८ वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद मला हिमाचलप्रदेशमध्ये साजरा करता आला हे मी माझं भाग्य समजतो असही ते म्हणाले. गरीबकल्याण आणि सुशासनासाठी केलेल्या योजनांनी सरकारची व्याख्या बदलली आहे, देशवासियांसाठी सरकार म्हणजे आता पूर्वीसारखं मायबाप नसून ते एक सेवक झालं आहे असंही ते म्हणाले. आजचा नवीन भारत हा एकीकडे शत्रूच्या डोळ्यात डोळे घालून बघणारा तर दुसरीकडे दबावरहीत मदतीचा हात गरजू राष्ट्रांना पुढे करणारा आहे असं प्रधानमंत्री मोदींनी सांगितलं. विविध क्षेत्रात होत असलेल्या विकासकामांची माहिती प्रधानमंत्री मोदींनी यावेळी दिली. दरम्यान कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या ११ व्या हप्त्याचं हस्तांतरण प्रधानमंत्री मोदींनी केलं. याव्दारे १० हजार कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात २१ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी थेट हस्तांतरित करण्यात आला.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.