प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज करणार मध्यप्रदेश स्टार्टअप धोरणाचा प्रारंभ

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे मध्यप्रदेश स्टार्टअप धोरणाचा प्रारंभ करणार आहेत. इंदूर इथं होणाऱ्या परिषदेत मोदी स्टार्टअप समुदायाला संबोधित करणार आहेत. त्याचबरोबर मोदी यांच्या हस्ते स्टार्टअप पोर्टलचं देखील उद्घाटन होणार आहे. स्टार्टअप प्रणालीला प्रोत्साहन आणि मदत करण्याच्या हेतूनं या उपक्रमांचा प्रारंभ होत आहे. या परिषदेत सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील धोरणकर्ते, नवोन्मेषक, नवउद्योजक, शैक्षणिक, गुंतवणूकदार, मार्गदर्शक आदी क्षेत्रातील तज्ञ सहभाग घेणार आहेत. परिषदेदरम्यान प्रधानमंत्री स्टार्टअप उद्योजक आणि शैक्षणिक संस्थांच्या प्रमुखांशी संवादही साधणार आहेत. याशिवाय स्टार्टअप सुरू करण्यासंदर्भात उद्योजकांना निधीच्या विविध स्रोतांविषयी मार्गदर्शन केलं जाणार आहे. स्टार्टअपच्या जाहिराती आणि ब्रँड व्हॅल्यूविषयीदेखील माहिती दिली जाणार आहे.