जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी बंद

 


मुंबई (वृत्तसंस्था) : मुरूडचा जंजिरा किल्ला कालपासून पर्यटकांसाठी बंद करण्यात आला. किल्ल्यात जाण्यासाठी शिडाच्या बोटींचा वापर केला जातो; पण बदलत्या वातावरणामुळे सुटलेला सोसाट्याचा वारा आणि त्यामुळे उसळणाऱ्या महाकाय लाटांमुळे बोटी किल्ल्यावर जाताना अपघात होऊ शकतो.ही शक्यता गृहित धरून मेरी टाइम बोर्ड आणि पुरातत्व विभागानं हा निर्णय घेतला आहे.