महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मालमत्तेवर सक्तवसुली संचालनालयाचे छापे

 


मुंबई (वृत्तसंस्था) : रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीमध्ये मालमत्ता खरेदी संदर्भातल्या कथित आर्थिक घोटाळ्या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मुंबई, पुणे, दापोली इथल्या काही मालमत्तांवर धाड टाकली आहे. संचालनालयानं परब यांना समन्स बजावलं होतं आणि त्यांची चौकशी केली होती. दापोलीमध्ये मालमत्ता खरेदी-विक्री संदर्भात आर्थिक घोटाळा केल्याचा परब यांच्यावर आरोप असून  संचालनालय या प्रकरणाची कसून चौकशी करत आहे.