सीमावर्ती भागांचा विकास हा सरकारच्या सर्वंकष सुरक्षा धोरणाचा मुख्य भाग - राजनाथ सिंग

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीमावर्ती भागांचा विकास हा सरकारच्या सर्वंकष सुरक्षा धोरणाचा मुख्य भाग असून यामुळे देशाची सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत होणार असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्लीत सीमा रस्ते संघटनेच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यामुळे सीमा भागात राहणाऱ्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल होतील असं त्यांनी सांगितलं.

गेल्या काही वर्षात उत्तर क्षेत्रात चीनची घुसखोरी वाढल्यानं सीमा रस्ते संघटनेनं आपलं काम सुरू ठेवत तंत्रज्ञानाच्या सहकार्यांनं आपली क्षमता वाढवण गरजेचं असल्याचा सिंग म्हणाले.

या  अर्थसंकल्पात सीमा रस्ते संघटनेच्या तरतुदीत चाळीस टक्क्यांनी वाढ करत २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी ते साडेतीन हजार कोटी रुपये केल्याची माहिती सिंग यांनी यावेळी दिली. सरकारचा देशाच्या सुरक्षेला आणि सीमा भागाच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य असल्याचा पुनरुच्चार सिंग यांनी यावेळी केला.