अमरनाथ यात्रेला येत्या ३० जूनपासून सुरुवात

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर, जम्मू-कश्मीरच्या नायब राज्यपालांचे मुख्य सचिव आणि श्री अमरनाथ श्राईन बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीश्वर कुमार यांनी काल बालताल इथं जाऊन यात्रेकरुंच्या सुविधांचा आढावा घेतला.

यावेळी त्यांनी, यात्रेकरूंसाठी उभारण्यात आलेल्या निवासी सुविधा, वाहनतळ आणि इतर सुविधांना भेट दिली. अमरनाथ यात्रेला येत्या ३० जूनपासून सुरुवात होत आहे.