प्रधानमंत्री नरेंद्र मोदी डेन्मार्कमधल्या कोपनहेगनला पोचले

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी डेन्मार्कमधल्या कोपनहेगन इथं पोचले आहेत. ही त्यांची पहिलीच डेन्मार्क भेट आहे. डेन्मार्कचे प्रधानमंत्री मेट फ्रेड्रीक्सन यांच्याशी ते गुंतवणूक, कौशल्य विकास, व्यापार, हरित तंत्रज्ञान, कृषी तंत्रज्ञान आणि जहाजबांधणी क्षेत्रातल्या भागिदारी विषयी चर्चा करणार आहेत.

परराष्ट्र व्यवहार सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी ही माहिती दिली. डेन्मार्कच्या महाराणी मार्गरेट द्वितीय यांचीही ते भेट घेणार आहेत. उत्तर युरोपीय देशांच्या संमेलनात तसंच भारतीय समुदायाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते भाषण करणार आहेत. डेन्मार्कमधल्या भारतीय समुदायात प्रधानमंत्र्यांच्या भेटीचा आनंद दिसून येत आहे. दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात प्रधानमंत्री मोदी फ्रान्सला धावती भेट देणार असून, पॅरीस इथं ते फ्रान्सचे प्रधानमंत्री एमन्युईल मॅक्राँ यांच्याशी चर्चा करतील.