देशातील कृषीविषयक संशोधनाचा दर्जा आणि क्षमता वाढवण्याचं उपराष्ट्रपतींचं आवाहन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कृषीविषयक संशोधनाचा दर्जा आणि क्षमता वाढवण्याचं आवाहन उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी केलं आहे. हैद्राबादच्या राष्ट्रीय कृषी संशोधन व्यवस्थापन अकादमीत कृषी व्यवसाय व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते.

काळाच्या गरजेनुसार तंत्र आणि उद्दिष्टांमधे बदल करुन संशोधनाची व्याप्ती वाढवली पाहिजे असं त्यांनी सांगितलं. वैज्ञानिक दृष्टीकोन साध्या सोप्या शब्दात शेतकऱ्यांमधे रुजवला पाहिजे असंही ते म्हणाले. या अभ्यासक्रमात चमकदार कामगिरी करणाऱ्या निवडक विद्यार्थ्यांना उपराष्ट्रपतींनी पदकं प्रदान केली.

Popular posts
सिक्कीममधील पुरात १४ जणांचा मृत्यू, १०२ जण बेपत्ता
Image
‘वसुधैव कुटुंबकम्’चे उद्दिष्ट गाठण्यासाठी योग सहाय्यक - राज्यपाल
Image
करगिल युद्धातील विजयाच्या २२ व्या स्मृतीदिनानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांद्वारे हुतात्म्यांना अभिवादन
Image
दावा न केलेल्या ठेवी शोधून त्या लाभार्थ्यांना परत मिळवून देण्यासाठी केंद्रीकृत संकेतस्थळ विकसित करण्याची भारतीय रिझर्व बँकेची घोषणा
Image
'इंद्रायणी स्वच्छता' जनजागृती मोहिमेअंतर्गत रीव्हर 'सायक्लोथॉन २०२२' रॅलीचे रविवारी आयोजन
Image