अनिल देशमुख यांना जामिनासाठी याचिका दाखल करण्याची परवानगी

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :सर्वोच्च न्यायालयानं राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयात  जामिनासाठी याचिका दाखल करण्याची परवानगी दिली आहे. उच्च न्यायालय या याचिकेची लवकर सुनावणी करेल अशी आशा आहे, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. देशमुख यांची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभाग- सीबीआय कडून विशेष तपास पथक अर्थात एसआयटीकडे सोपवण्याची राज्य सरकारची मागणी सर्वोच्च न्यायालयानं एक एप्रिलला फेटाळली होती.